belgaum

मतदार यादीसाठी एसआयआर अर्जाची माहिती देणे बंधनकारक

0
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी एसआयआर सर्वेक्षण अर्जात अचूक माहिती भरून तो मुदतीत जमा करणे बंधनकारक असल्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी कार्तिक एम. यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बेळगाव उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या एसआयआर सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मतदान केंद्र अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना हे सर्वेक्षण अर्ज देत आहेत.

या प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाने सहभागी होणे आवश्यक असून, अर्जात कोणतीही चूक न करता योग्य माहिती भरणे गरजेचे आहे. या प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात काही शंका किंवा गोंधळ असल्यास त्यांनी बीएलओ, पर्यवेक्षक किंवा थेट महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाशी संपर्क साधून मदत घ्यावी, असे आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले.

 belgaum

नागरिकांनी हा अर्ज पूर्णपणे भरून २९ जुलै या निगडित मुदतीत बीएलओंकडे परत करणे आवश्यक आहे. जर या विहित मुदतीत अर्ज सादर केला नाही, तर मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असून त्याला नागरिक स्वतः जबाबदार राहतील.

त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून ही प्रक्रिया सुलभ करावी, अशी प्रतिक्रिया आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.