belgaum

राष्ट्रीय पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दोन वेळा अनावरण करून आणि त्यांचा वापर राजकारणासाठी करून मोठा अपमान केला आहे. याविरोधात मराठी माणसाने पेटून उठले पाहिजे. संघटित झालो तरच मराठी माणसांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे 19 मार्च रोजीच्या अभिषेक आणि शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

bg

राजहंसगड येथे होणार्‍या अभिषेक आणि शुद्धीकरण कार्यक्रमासंदर्भात राजहंसगड येथील सिद्धेश्वर मंदिरात म. ए. समिती नेते आणि ग्रामस्थांची बैठक झाली. राजकीय पक्षांकडून झालेला छत्रपती शिवरायांचा अपमान धुवून काढण्यासाठी राजहंसगडवासियांनी 19 मार्च रोजीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीत श्री सिद्धेश्वर देवस्थान किल्ला ट्रस्ट कमिटी व सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. त्याचबरोबर सोहळ्यासाठी जी जबाबदारी सोपवण्यात येईल ती स्वीकारून यशस्वी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, भागोजी पाटील, पुंडलिक पावशे आदींनी विचार व्यक्त केले.

Rajhans gad
बैठकीस श्री सिद्धेश्वर देवस्थान किल्ला ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र गडकरी, उपाध्यक्ष धाकलू इंगळे, सेक्रेटरी बसवंत लोखंडे, खजिनदार मारुती इंगळे, सदस्य सिद्धाप्पा नाईक, नानाजी लोखंडे बुधाजी इंगळे, बसवंत चव्हाण, चंद्रकांत हावळ, शिवानंद मठपती, रामा इंगळे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरवत उपाध्यक्ष शिवपुत्रय्या बुर्लकट्टी, सेक्रेटरी सुरेश थोरवत,

सदस्य शंकर नागुर्डेकर, हनुमंत नावगेकर, पी. जी. पवार, बसवंत पवार, सिद्धाप्पा पवार, गुरुदास लोखंडे, नारायण मोरे, रामा हावळ, रुक्माण्णा हावळ, निलेश कुंडेकर, महादेव चव्हाण, मारुती गडकरी, ज्ञानेश्वर नरवाडे, कृष्णा यळेबैलकर, संदीप मोरे, गंगाधर पवार आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.