Sunday, July 14, 2024

/

साईराज ‘अ’ संघाने हस्तगत केला श्री चषक; अल रझाला उपविजेता

 belgaum

श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित तिसऱ्या श्री चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बलवान साईराज ‘अ’ संघाने हस्तगत केले आहे. स्पर्धेच्या आज रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात साईराज संघाने प्रतिस्पर्धी अल रझा ‘अ’ संघावर 10 गडी राखून एकतर्फी विजय मिळविला. साईराज ‘अ’ संघाचा मदन बेळगावकर हा मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला.

श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित तिसऱ्या श्री चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची आज रविवारी सायंकाळी प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी सांगता झाली. स्पर्धेचा दोन डावांचा अंतिम सामना साईराज ‘अ’ संघ आणि अल रझा ‘अ’ संघ यांच्यात खेळविण्यात आला. साईराज संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अलरझा संघाने आपल्या पहिल्या डावात मर्यादित 10 षटकात सात गडी बाद 83 धावा काढल्या.

साईराजच्या किरण याने 16 धावा 3, भूषण याने 26 धावा 2 तर रफीक याने 19 धावात 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल साईराज संघाने मर्यादित 10 षटकार 3 गडी गमावत 183 धावांचा डोंगर उभारला. त्यांच्या कुणाल खोंड आणि मोहन बी. यांनी तडाखेबंद चौफेर फटकेबाजीचे प्रदर्शन करत उपस्थित त्यांची मने जिंकली. कुणाल खोंड याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 11 षटकारांसह नाबाद 89 धावा झळकविल्या. मर्यादित षटकांमुळे त्याचे शतक अवघ्या 11 धावांनी हुकले. त्याला भक्कम साथ देताना मोहन बी. याने 25 चेंडूत 3 चौकार व 9 षटकारांच्या सहाय्याने 76 धावा काढल्या. या पद्धतीने साईराज ‘अ’ संघाने पहिल्या डावात तब्बल 106 धावांची मजबूत आघाडी घेतली.

साईराजने घेतलेली आघाडी मोडून काढत आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अल रझा ‘अ’ संघाला अपयश आले. त्यांना मर्यादित 10 षटकात 5 गडी बाद 109 धावा करता आल्या. साईराजच्या करण (25/2), भूषण (25/2) व मदन (21/1) यांनी यशस्वी गोलंदाजी केली. परिणामी विजयासाठी अवघ्या 4 धावा काढण्याचे आव्हान साईराज ‘अ’ संघाने अवघ्या दोन चेंडूत सहज मोडीत काढले. त्यांचा सलामीचा फलंदाज मदन बी. याने चौकार ठोकून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.Sairaj worriers won

अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे पुरस्कर्ते प्रथमेश मोहन मोरे, दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे पुरस्कर्ते हॉटेल विराटचे कपिल भोसले, जयेश भातकांडे आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्या साईराज अ संघाला 1 लाख 88 हजार 888 रुपयांच्या रोख पारितोषिकासह आकर्षक भव्य करंडक बक्षीसा दाखल देण्यात आला.

उपविजेत्या अल रझा अ संघाला देखील आकर्षक पारितोषिक देण्याबरोबरच मान्यवरांच्या हस्ते वैयक्तिक पारितोषिक विजेत्या खेळाडुंनाही गौरविण्यात आले. स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत. अंतिम सामन्यातील सामनावीर -कुणाल खोंड (साईराज अ), उत्कृष्ट फलंदाज -श्रवण पवार (साईराज ब), उत्कृष्ट गोलंदाज -किरण तारळेकर (साईराज अ), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -किरण तरळेकर (साईराज अ), उत्कृष्ट झेल -करण गोसावी (श्री स्पोर्ट्स), मालिकावीर -मदन बेळगावकर (साईराज अ). मालिकावीर पुरस्कार विजेत्या मदन बेळगावकर याला मोटरसायकल बक्षीसा दाखल देण्यात आली. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री स्पोर्ट्स खडक गल्लीच्या पदाधिकारी आणि सदस्यांसह स्पर्धेचे पंच, स्कोरर, ग्राउंड्समन यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.