belgaum

बेंगलोर -मुंबई नव्या वंदे भारत स्लीपर रेल्वेला मंजुरी –

0
626
 belgaum

बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारने बेंगलोर ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे आणि माझ्या विनंतीला प्रतिसाद म्हणून ही रेल्वे केएसआर बंगळूर स्टेशनपासून कल्याण कर्नाटक मार्गे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावेल, अशी माहिती धारवाडचे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

आपल्या एक्स हँडल वरून माहिती देताना मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकच्या मध्यवर्तीय भागातून तुमकुर दावणगिरी, हावेरी, हुबळी, धारवाड आणि बेळगावमार्गे मुंबई या व्यापारी शहरापर्यंत जाणाऱ्या बंगळूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वेसाठीच्या माझ्या विनंतीला आधीच अतिरिक्त मंजुरी देण्यात आली होती असे स्पष्ट करून केंद्रीय .

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरात लवकर सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याच्या आणि येत्या कांही दिवसांत तिचे वंदे भारत शयनयान (स्लीपर) रेल्वेमध्ये रूपांतर करण्याच्या आपल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार केल्याबद्दल राज्याच्यावतीने रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 belgaum

राज्याच्या विकासाबरोबरच ही नवीन वंदे भारत रेल्वे कल्याण कर्नाटक प्रदेशाचे महत्त्व आणखी वाढवेल, राज्यातील व्यावसायिक घडामोडींना चालना देईल आणि उत्कृष्ट प्रवास सुविधा प्रदान करेल.

बेंगलोर आणि मुंबई या व्यापारी शहरादरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर रेल्वे चालवण्यास परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.