belgaum

ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध; बिनशर्त माफीची मागणी

0
409
Derek fernandise
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बिशप डेरिक फर्नांडीस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप लिओ सोळावे यांच्याविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, अशा वक्तव्यामुळे जगभरातील कोट्यवधी कॅथलिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात बिशप फर्नांडिस यांनी सांगितले की, युद्धाविरोधात पोप यांनी केलेली टीका तसेच शांतता, सलोखा आणि संवादासाठी केलेले आवाहन हे सत्य, न्याय आणि सुवार्तेच्या शिकवणीवर आधारित आहे. “विध्वंसक युद्धाचा निषेध करणे हे पोप लिओ चौदावे यांचे कर्तव्य असून ते पूर्णपणे योग्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पोप यांचे शांततेचे आवाहन हे राजकीय सोयीचे नसून ख्रिस्ताने दिलेली पवित्र जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुवार्तेनुसार प्रत्येकाने शांततेचा दूत व्हावे, त्यामुळे हिंसा आणि संघर्ष टाळण्याचे आवाहन करण्यात कोणतीही चूक नाही, असेही त्यांनी सांगितले.

 belgaum

“शांततेचा प्रसार करणे ही प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे,” असे बिशप फर्नांडिस म्हणाले.

पोपांविषयी कोणत्याही प्रकारचा अनादर हा कठोर शब्दांत निषेधार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. कॅथलिक चर्चचे प्रमुख आणि पृथ्वीवरील ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून पोप यांना विशेष आध्यात्मिक आणि नैतिक स्थान असल्याचे त्यांनी सांगितले. “पोपांचा अपमान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी श्रद्धाळूंच्या भावनांचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.

तसेच, व्हॉटिकन सिटी या सार्वभौम राष्ट्राचे प्रमुख म्हणून पोप यांच्यावर केलेला कोणताही आघात हा राजनैतिक दृष्ट्याही गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अण्वस्त्रांच्या बाबतीत काही देशांना समर्थन देणे आणि इतरांना नाकारणे हा विरोधाभास असल्याची टीका करत त्यांनी सर्व देशांनी अण्वस्त्रविरहित होण्याचे आवाहन केले. “जगात कोणाकडेही अण्वस्त्रे नसावीत. खरी शांतता भीती, धमकी किंवा असमतोलावर नव्हे, तर विश्वास, निःशस्त्रीकरण आणि परस्पर सन्मानावर उभी राहते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांची विधाने बेजबाबदार असून नैतिक अधःपतनाचे द्योतक असल्याचे सांगत बिशप फर्नांडिस यांनी त्यांच्याकडून बिनशर्त माफीची मागणी केली. “सार्वजनिक व्यक्तींनी आपल्या शब्दांची जबाबदारी घ्यावी. जेव्हा शब्द श्रद्धा, सन्मान आणि शांततेला धक्का देतात, तेव्हा त्यात नम्रतेने दुरुस्ती केली पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.

शेवटी त्यांनी म्हटले, “शांतता ही कमकुवतपणा नाही—तीच खरी ताकद आहे. सन्मान हा पर्याय नसून गरज आहे. आणि नेतृत्व हे सत्य, न्याय आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.