belgaum

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प येथील मिलिटरी स्कूलकडे जाणाऱ्या मार्गावरील म्हसोबा मंदिर शेजारी चर्च समोर असलेल्या उद्यानाची पूर्ववत चांगल्या प्रकारे निगा राखण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

कॅम्प येथील मिलिटरी स्कूलकडे जाणाऱ्या मार्गावरील म्हसोबा मंदिर शेजारी चर्च समोर असलेल्या उद्यानाची सध्या पार दुरवस्था झाली आहे सदर उद्यानाच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

फिरावयास येणाऱ्यांसाठी आसन व्यवस्था तसेच अन्य सोयी करण्याद्वारे सहा महिने वर्षभरापूर्वी या उद्यानाची चांगली निगा राखली जात होती. त्यामुळे उद्यानाच्या ठिकाणी नेहमी हिरवेगार आल्हाददायक वातावरण असायचे. मात्र अलीकडे गेल्या कांही महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे या उद्यानाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. Camp garden

परिणामी पालापाचोळा साचून सर्वत्र स्वच्छता तर पसरलीच आहे, शिवाय पाण्याची सोय नसल्यामुळे येथील फुलझाडे तसेच अन्य झाडांची केविलवाणी अवस्था झाली आहे. फुलझाडे खुरटत चालले आहेत. यासंदर्भात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर उद्यानाची योग्य प्रकारे देखभाल ठेवण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.