Thursday, March 28, 2024

/

धरणे आंदोलनात चंद्रकांतदादांचे आटोपशीर भाषण!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात येऊन कन्नड भाषेत भाषण करून तसेच विविध वक्तव्य करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरे गेलेले महाराष्ट्राचे सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरणे आंदोलनात आटोपशीर भाषण केले.

व्यासपीठावर मनोगत व्यक्त करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील उभे राहताच सीमावासीयांनी जोरदार घोषणाबाजी केली. सीमावासीयांना देण्यात येणाऱ्या सुविधा आम्हाला नको परंतु सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करून महाराष्ट्राने भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी अशी मागणी उपस्थित सीमावासीयांनी केली.

यावेळी चंद्रकांतदादा पाटलांनी पुन्हा महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा पाढा वाचत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पाच किंवा दहा सदस्यांच्या शिष्टमंडळाने ताबडतोब विधानसभेत हजर राहण्याची सूचना केली.

 belgaum

सीमाभागातील ८६५ खेड्यांमधील १५वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिकांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी चंदगड येथे समन्वयक कार्यालयाची स्थापना कारण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे.Chandrkant dada

सीमाप्रश्नी ज्या पद्धतीने चालढकल सुरु आहे यासंदर्भात चांगल्या वकिलांची नेमणूक करून बैठक घेण्यात येतंय. सीमाप्रश्नी लवकरच दिल्ली येथे आपण जाणार असून न्यायप्रविष्ट असणाऱ्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडत आहे.

सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभे असल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.