belgaum

मार्केट अँटि स्टेबिंग स्क्वाडची कारवाई; युवकाकडून ड्रॅगन चाकू जप्त

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या ‘अँटि स्टेबिंग स्क्वाड’ या पथकाने काल एका युवकाला अटक करून त्याच्याकडील धारदार ड्रॅगन चाकू जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नांव वैभव प्रकाश कुरणे (वय 23, भातकांडे गल्ली, बेळगाव) असे आहे. अलीकडे बेळगाव शहरात वाढलेल्या चाकू व अन्य शस्त्राने प्राणघातक भोसकाभोसकी करण्याच्या प्रकारांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण व्याप्तीतील पोलीस ठाण्यांमध्ये अँटि स्टेबिंग स्क्वाड अर्थात भोसकाभोसकी प्रतिबंधक पथकाची रचना करण्यात आली आहे.

सार्वजनिकांच्या सुरक्षेसाठी ही पथके रात्रंदिवस गस्त घालून संशयीतांची झडती घेत असतात. त्या अनुषंगाने मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर यांच्या नेतृत्वाखालील अँटी स्टॅबिंग स्क्वाडने शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळ आरोपी वैभव याला अडवून त्याची झडती घेतली असता त्याने बेकायदेशीररित्या स्वतःजवळ प्राणघातक ड्रॅगन चाकू बाळगल्याचे उघडकीस आले.

 belgaum

त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करण्याबरोबरच त्याच्या जवळील चाकू जप्त केला. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात पुन्हा नोंदी झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.