Saturday, April 20, 2024

/

सरदार मैदानावर बुधवारी चमकले ‘हे’ दोन परगावचे क्रिकेटपटू

 belgaum

अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित आमदार ॲड. अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेद्वारे देशातील स्टार टेनिसबॉल क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली आहे.

मुंबई, पुणे, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र, गोवा वगैरे ठिकाणचे खेळाडू या स्पर्धेत चमकणार असल्यामुळे हळूहळू या स्पर्धेची उत्कंठा वाढत आहे. त्या अनुषंगाने आजपासून बेळगाव लाईव्ह शहरवासीयांना सरदार मैदानावर हजेरी लावणाऱ्या परगावच्या खेळाडूंचा थोडक्यात परिचय करून देणार आहे.

आमदार ॲड. अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या आज बुधवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या जी. जी. बॉईज संघातील संदीप मकवाना (कोल्हापूर) आणि नरेंद्र मांगुरे (निपाणी) हे दोन खेळाडू परगावचे आहेत. यापैकी संदीप मकवाना याने शैलीदार फलंदाजीद्वारे अर्धशतक झळकवत आज आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.Kop nipani players

महाराष्ट्रातील देवगड जिल्ह्यातील आनंदवाडी येथील क्रिकेट स्पर्धा नुकतीच गाजून आलेला मकवाना हा मुळचा कोल्हापूरचा असला तरी कोकण भागात एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याचा नावलौकिक आहे.

जी. जी. बॉईज संघातील दुसरा खेळाडू निपाणीचा नरेंद्र मांगुरे हा एक अष्टपैलू टेनिस बॉल क्रिकेटपटू आहेत. भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मांगुरे याने अलीकडेच झालेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत ‘मालिकावीर’ हा किताब हस्तगत केला आहे. बेळगाव जिल्ह्यासह कुमठा, कारवार, गोवा, कोल्हापूर जिल्हा, कणकवली आदी ठिकाणच्या टेनिसबॉल जणू क्रिकेट स्पर्धा नरेंद्र मांगुरे याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर गाजवल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.