Thursday, April 25, 2024

/

ग्रामविकास निधी लंपास; बिजगर्णी ग्रामस्थांची तक्रार

 belgaum

बिजगर्णी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी गावकऱ्यांनी जमा केलेला 7 लाख रुपयांचा ग्राम विकास निधी बेळगुंदी येथील रविकिरण को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून लंपास करण्यात आला आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बिजगर्णी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे सहकार खात्याच्या उपसंचालकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

बिजगर्णी गावकऱ्यांनी आज बुधवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या सहकार भवन येथील सहकारी खात्याच्या उपसंचालकांकडे उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. बिजगर्णी (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी गावकऱ्यांनी जमा केलेल्या 7 लाख रुपयांच्या निधीमध्ये मोठी अफरातफर झाली

असून खुद्द गाव कमिटी चेअरमन यल्लाप्पा पिराजी बेळगावकर यांनी अब्दुल अहमदनगर यांच्या सहकार्याने सदर कृत्य केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. बिजगर्णी (ता. बेळगाव) गावच्या ग्रामस्थ मिळून गाव कमिटी स्थापन केली आहे. त्याचे चेअरमन यल्लाप्पा पिराजी बेळगावकर आहेत. गावकऱ्यांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी 7 लाख रुपयांचा ग्राम विकास निधी रविकिरण को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगुंदी या सोसायटीमध्ये यल्लाप्पा पिराजी बेळगावकर, वसंत लक्ष्मण अष्टेकर व अब्दुल अहमद नावगेकर यांच्या संयुक्त स्वाक्षरीसह ठेवण्याबाबत चर्चा केली होती.Bijgarni

 belgaum

परंतु सदर रक्कम सामायिक ग्रामस्थांची असली तरी संबंधित तिघांच्या नावावर ती ठेवण्यात आली होती. मात्र आता सोसायटीमध्ये 181 दिवसांच्या ठेवीच्या स्वरूपात ठेवलेली ही रक्कम परस्पर लंपास करण्यात आली आहे. तिघांच्या स्वाक्षरीनिशी सदर रक्कम सोसायटीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वसंत लक्ष्मण अष्टेकर यांना अथवा गावकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता उर्वरित दोघांनी संधीचा फायदा घेत ठेवीच्या मुदतीपूर्वीच गाव कमिटीची 7 लाख रुपयांची रक्कम काढून लंपास केली आहे. तरी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन बिजगर्णी गावकऱ्यांना विधायक कामासाठी त्यांनी जमा केलेली 7 लाख रुपयांची रक्कम परत मिळवून द्यावी.

तसेच पैशाची अपरातफर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी श्रीरंग भाष्कळ, वसंत अष्टेकर, दामू मोरे, नारायण चौगुले, विष्णू मोरे, सुभाष पाटील, यशवंत जाधव, अशोक बिर्जे आदींसह बहुसंख्या बिजगर्णीवासीय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.