belgaum

यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात भरणार साहित्य संमेलन

0
 belgaum

ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी


बेळगाव लाईव्ह : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे उत्साहात पार पडणार आहे. साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा जागर घडवणारे हे संमेलन तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले असून, राज्यभरातील साहित्यप्रेमींचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.


संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि व्याख्याते यशवंत पाटणे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. आपल्या प्रभावी लेखनशैली, सामाजिक भान आणि ओजस्वी वक्तृत्वामुळे त्यांनी मराठी साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.


‘शेकोटी’, ‘स्वरगंगेच्या काठी’, ‘सहावे सुख’, ‘चैतन्याचे चांदणे’ आणि ‘जगाच्या कल्याणा’ यांसारख्या साहित्यकृतींमुळे यशवंत पाटणे यांना वाचकांची विशेष पसंती मिळाली आहे. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 belgaum

संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मराठा मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली. बैठकीत संमेलनाच्या तयारीसंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलनाची माहिती दिली.


बैठकीस जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, रणजित चौगुले, एल. पी. पाटील, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर, संजय गौडाडकर, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, रोशनी हुंद्रे, मनीषा नाडगौडा, सविता व्यसने, गीता घाडी, संजिवनी खंडागळे, नेत्रा मेणसे, स्मिता मेंडके आणि स्मिता किल्लेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.