belgaum

देशाला ई-वेस्टची (इलेक्ट्रॉनिक) मोठी समस्या भेडसावत असल्यामुळे देश पातळीवरील ई-वेस्ट संकलन करण्याचा उपक्रम लायन्स क्लबने आखला आहे. बेळगावातही हा उपक्रम राबविला जात असून उद्या शुक्रवार 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत नागरिकांनी आपल्याकडील ई-वेस्ट लायन्सकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

bg

ई-वेस्ट संकलनाच्या बेळगावातील उपक्रमाचे उद्घाटन उद्या शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. मंडोळी रोडवरील लायन्स भवन येथे होणार आहे. तरी या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन लायन्सने केले आहे. लायन्स क्लबने पहिल्यांदाच असा उपक्रम आखला असून ज्यामुळे देशातील ई-वेस्टची समस्या कांही अंशी का असेना कमी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. ई-वेस्टमुळे पर्यावरणाचे नुकसान आणि प्रदूषणातही वाढ होत आहे. प्रत्येक घरासह शाळा कॉलेजेस वगैरे संस्थांमध्ये ई-वेस्ट आहे. लायन्स डिस्ट्रिक्ट -317 बी यांच्या अंतर्गत उत्तर कर्नाटक व गोवा हा भाग येतो. या अंतर्गत एकूण 104 लाईन्स क्लब असून बेळगाव परिसरातील सहा क्लबकडून ई-वेस्ट संकलनाचा उपक्रम आखला गेला आहे. यात लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडी शहापूर मिड टाउन खानापूर व गोकाक हे क्लब आहेत.

ई-वेस्टमध्ये खराब झालेला मोबाईल, संगणक, टीव्ही, रिमोट, फ्रिज आदींचा समावेश करता येईल. या वस्तू जमा करून पुनर्वापर प्रक्रियेसाठी त्या बेंगलोरला पाठवून दिल्या जाणार आहेत. नागरिकांनी बेळगावात पुढील ठिकाणी या वस्तू अर्थात ई -वेस्ट जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1) भारती वडवी, रानडे कॉलनी पहिला क्रॉस हिंदवाडी (मो.नं. 9845538279), 2) बी. एच. पाटील, सरोजिनी बिल्डिंग आठवा क्रॉस भाग्यनगर, 3) प्रभाकर शहापूरकर, प्लॉट नं. 14 पठाडे क्लिनिकसमोर चन्नम्मानगर (मो.नं. 9448941765), 4) संजीव कब्बूर, शिवबसवनगर अपोलो फार्मसीच्या पुढे, अथवा 5) सतीश बाळेकुंद्री, सत्यम फ्लॅट नं. 30 दुसरा क्रॉस हनुमाननगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.