belgaum

बेळगाव मराठा सेंटर येथे 15 पासून डीएससी भरती मेळावा

0
Maratha centre logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे येत्या सोमवार दि. 15 व मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी डीएससी एनसीओ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा नियमित लष्कराच्या टीए कर्मचाऱ्यांमधील माजी सैनिकांसाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लर्क एचडी पदांसाठी आहे.

सदर भरती मेळाव्यासाठी महत्त्वाचा पात्रता निकष म्हणजे उमेदवारांनी केवळ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमध्ये सेवा बजावलेली असावी. लष्कराच्या मागील सेवेतून सेवामुक्त होताना उमेदवाराचे मूल्यांकन केलेले चारित्र्य अनुकरणीय किंवा खूप चांगले असावे.

सोल्जर जीडी पदासाठी वय 46 वर्षांपेक्षा कमी आणि सोल्जर क्लर्क पदासाठी 40 वर्षांपेक्षा कमी असावे. शिक्षण मॅट्रिक किंवा त्याहून अधिक, किंवा नॉन-मॅट्रिकसाठी एसीई-III असावे.

 belgaum

सोल्जर जीडी पदासाठी पुनर्नोंदणीची तारीख पूर्वीच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यापासून 2 वर्षांच्या आत आणि सोल्जर क्लार्क एसडीसाठी 5 वर्षांच्या आत असावी. तरी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी येत्या सोमवार दि. 15 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेंटरच्या मेजर /लेफ्ट. कर्नल ऍडजुस्टंट यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.