belgaum

शहापूर पोलिसांकडून १५.७३ लाखांचे सोने जप्त; आरोपी अटक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नार्वेकर गल्ली येथे एका घरात विश्वासाने दिलेले सोन्याचे दागिने आणि दुरुस्तीसाठी दिलेला सोन्याचा हार मालकाला न सांगता लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

कृष्णा मोहन मैती (वय ३६, रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश, सध्या रा. शहापूर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी आरोपीकडून १५,७३,३७० रुपये किमतीचे एकूण १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ६३/२0२६, कलम ३१६(२) बीएनएस-२0२३) नोंदवण्यात आला आहे.

 belgaum

बेळगावचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, पीएसआय मणिकंठ पुजारी, महिला पीएसआय एस. एन. बस्वा आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.