Thursday, April 25, 2024

/

सोमवारी नागपूर अधिवेशनात ठराव तर जानेवारीत कोल्हापुरात सिमापरिषद

 belgaum

कर्नाटक विधानसभेने बेळगाव सीमाप्रश्न विरोधी ठराव कर्नाटक विधिमंडळात मांडल्यानंतर, आता सोमवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेळगाव सीमाप्रश्नबद्दल ठराव मांडला जाणार आहे असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

माजी आमदार मनोहर किनेकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना कोल्हापूर दौऱ्या संदर्भात माहिती देताना सांगितले, की माजी मंत्री जयंत पाटील यांना आम्ही सोमवारी महाराष्ट्र बंदच्या सर्वपक्षीयांच्या महाराष्ट्र बंदच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यासमोरच्या धरणे आंदोलनामध्ये स्वतः सहभागी होण्याची विनंती केली. त्यावेळी आपण नागपूरच्या विधिमंडळात जाणार असून त्या ठिकाणी बेळगाव संबंधीचा ठराव मांडणार आहोत ,आणि या शिवाय आम्ही कोल्हापूरच्या सर्वच आमच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत., असे आश्वासन दिले. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या मागणीसाठीच्या आंदोलनासाठी कोल्हापुरातील सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून कोल्हापुरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत. बेळगावहून देखील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते कोल्हापूरत दाखल होऊन निदर्शन करणार आहेत.

सध्या बेळगाव सीमा भागामध्ये तिसरी पिढी कार्यरत झाली असून, युवकांचा भरणा चळवळीमध्ये वाढू लागलेला आहे. महाराष्ट्र सरकार केवळ कागदोपत्री सीमावासियांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर कृतीतून देखील आहे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्राने एक दिवशीय बंद करावा आणि सीमा भागातील लढ्यास पाठिंबा दर्शवावा. सीमा भागातील जनतेचे दुःख महाराष्ट्रातील जनतेला कळावे यासाठी आम्ही महाराष्ट्र बंदची मागणी सर्व पक्षांकडे केली असल्याचे किणेकरांनी यावेळी स्पष्ट केले.Mes kolhapur

 belgaum

पुढारीच्या संपादकांकडून ठोस आश्वासन

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धरणे आंदोलनाच्या नियोजनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाला दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांनी आश्वासन दिले आहे. बेळगावचा सीमा लढा टिकवण्यासाठी पत्रकारांचे योगदान आतापर्यंत महत्त्वाचे आहे .त्यात सर्वच वर्तमानपत्रिका आणि माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. दैनिक पुढारी या अगोदर देखील पाठीशी राहिलो आहोत, भविष्यात देखील आपण पाठीशी राहू असे आश्वासन देत सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना घेऊन बेळगाव सीमा प्रश्नसंदर्भात जानेवारी महिन्यामध्ये आपण स्वतः सीमा परिषद भरवणार असल्याचे आश्वासन जाधव यांनी यावेळी समिती कार्यकर्त्यांना दिले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा आजचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दिलीप पाटील,तालुका समितीचे सचिव एम जी पाटील पी आर ओ विकास कलघटगी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.