Saturday, April 20, 2024

/

असा असणार 1नोव्हेंबर रोजीचा पोलीस बंदोबस्त

 belgaum

बेळगावात एक नोव्हेंबर मराठी भाषिक काळा दिवस पाळतात तर कन्नड भाषिक राज्योत्सव साजरा करत असतात.एकीकडे सुतक दिन काळा दिवस तर दुसरीकडे राज्योत्सव जल्लोष अशीच काही परिस्थिती काय दिनानिमित्त एक नोव्हेंबर रोजी बेळगावत असते.

बेळगाव शहरातल्या उत्तर भागात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्योत्सवाची मिरवणूक काढली जाते तर दुसरीकडे एक नोव्हेंबर 1956 पासून भाषिक प्रांत रचनेत बेळगाव सह सीमाभाग कर्नाटक सामील केल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात का सुतक दिन काळा दिन म्हणून पाळतात.

बेळगाव शहरांमध्ये दरवर्षी काळया दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला जातो यंदाच्या राज्योत्सव मिरवणुकीसाठी आणि काळा दिनासाठी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तीन अतिरिक्त डीसीपी 12 एसीपी 52 पोलीस निरीक्षक सह अडीच हजार पोलीस कर्मचारी नऊ सीएआर आणि दहा केएसआरपीच्या तुकड्या 500 होमगार्ड आठ ड्रोन कॅमेरा 300 सीसीटीव्ही कॅमेरे यासह 35 व्हिडिओ कॅमेरे असा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.

राणी चन्नम्मा सर्कल शनिवार कोर्ट गणपत गल्ली मारुती गल्ली रामदेव गल्ली समदेवी गल्ली यंदे खुट कॉलेज रोड पुन्हा राणी चन्नम्मा सर्कल अशी राज्योत्सवाची मिरवणूक असते तर सकाळच्या सत्रात मध्ये धर्मवीर संभाजी उद्या नातुंन सुरू झालेली काळया दिनाची निषेध फेरी उत्तर दक्षिण भागात विविध गल्ल्यातून फिरते आणि गोवा वेस मराठा मंदिरा ते सांगता होते.

राज्योत्सवाच्या मिरवणुक आणि काळा दिवसाच्या निषेध पूर्वीच्या निमित्ताने मंगळवार एक नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरातल्या  रहदारीच्या मार्गात अनेक बदल करण्यात आलेले आहेत. ग्लोब थियेटर खानापूर रोड कडून बस स्थानकाकडे जाणारी वाहतूक ग्लोब कॅम्प क्लब रोड सदाशिवनगर मार्गे रामदेव कडून बस स्थानक अशी वळवण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.