Saturday, April 27, 2024

/

बेळगावातील डॉग शो मध्ये शेकडो श्वानांचा सहभाग

 belgaum

बेळगावच्या उद्यमबाग परिसरातील शगुन गार्डनमध्ये प्रवेश केल्यास रंगीत बेरंगी कुत्र्यांचा वावर तुम्हाला बघायला मिळाला कारण या ठिकाणी डॉग शोमध्ये विविध प्रकारच्या कुत्र्यांनी सहभाग घेतला होता.

या डॉग शो मध्ये कुत्र्यांची लहानलहान पिल्ले पाहिल्यास थक्क व्हाल जगात इतक्या कुत्र्यांच्या अनेक प्रजाती त्याचे दर्शन बेळगावकराना पाहायला मिळाले.

विश्वासाचे दुसरे नाव कुत्रा आहे. संस्कृतमध्ये याला श्वान असे संबोधले जाते. आजकाल लोकातून श्वानपालन हा छंद झाला आहे.वेगवेगळी कुत्री पाळणे त्यांना प्रशिक्षण देणे त्यांच्यासाठी विशेष आहार व्यवस्था देखील केली जात आहेत.

 belgaum

बेळगाव शहर हे कुत्र्यांच्या पालनासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून फक्त मांजरी पाळणाऱ्या आमच्यात कुत्र्यांचीही भर पडली. त्यामुळेच श्वानप्रेमींसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटना स्थापन करून या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.Dog show

बेळगाव सिने असोसिएशनच्या वतीने शहरातील शगुन गार्डन येथे दोन दिवसीय श्वान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्वान स्पर्धेत एकूण 1,700 श्वानांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत कर्नाटक, गुजरात, नाशिक, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, गोवा, श्रीरंगपट्टणा, कोडुगु, केरळ, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, औरंगाबाद, चेन्नई, कोल्हापूर यासह देशातील विविध भागातून आकर्षक श्वानांनी सहभाग घेऊन मनोरंजन केले.

रविवारी संपलेला हा डॉग शो बेळगावच्या श्वान प्रेमीमध्ये चर्चेचा विषय बनला होता सामान्य माणसाला या डॉग शो बद्दल माहिती नव्हती मात्र श्वान प्रेमीत याची चर्चा होती. बेळगावच्या कॅम्प भागात ब्रिटिश काळापासून कुत्री पाळली जातात.

किमान 5 हजार ते कोटी रु. मौल्यवान कुत्री या शो मध्ये सहभागी झाली होती रागाच्या भरात कधी कधी माणूस माणसाची तुलना कुत्र्याशी करतो हे सामान्य आहे. पण माणसापेक्षा कुत्र्याची किंमत जास्त आहे. आता पोलीस विभाग आणि भारतीय सैन्यातही कुत्र्यांच्या सेवा मिळाल्या आहेत. याचा उपयोग चोरांना पकडण्यासाठी, बॉम्ब शोधण्यासाठी आणि शत्रूंचा शोध घेण्यासाठी केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.