Saturday, April 20, 2024

/

देशात सर्वाधिक खपाची वैशिष्ट्यपूर्ण ‘मॅग्नस’ स्कूटर

 belgaum

सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कॉलेज रोडवरील यश ई -स्कूटर्स या सुप्रसिद्ध शोरूमने एंपियर बाय ग्रीव्हज कंपनीची पेट्रोल विरहित ‘मॅग्नस इएक्स’ ही देशातील सर्वाधिक खपाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली असून विविध वैशिष्ट्य असलेली ही नवी पर्यावरण पूरक स्कूटर ग्राहकांसाठी अत्यंत किफायशीर सोयीची व आनंददायक ठरत आहे.

देशातील एंपियर बाय ग्रीव्हज ही कंपनी गेल्या 2008 सालापासून इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करत आहे. गेल्या 14 वर्षात या ब्रँडेड कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनेक मॉडेल्स बाजारात आणल्या आहेत. त्यामध्ये सध्या मॅग्नस इएक्स स्कूटर सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे मायलेज 120 कि. मी. इतके आहे. म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 120 कि. मी. धावते. स्कूटर फुल्ल चार्ज करण्यासाठी अवघा 3 ते 3.5 तासाचा कालावधी पुरेसा असतो.

विशेष म्हणजे गाडी चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनला जावे लागत नाही, ही स्कूटर घरातील सिंगल फेज विजेवर देखील चार्ज करता येऊ शकते. या स्कूटरला एलईडी लॅम्प असून टायर ट्यूबलेस आहेत. तसेच गाडीला फ्रंट टेलिस्कोपिक हायड्रोलिक सस्पेन्शन आहे. मॅग्नसची डिकी स्पेस सर्वात मोठी असून इतर स्कूटर्सपेक्षा आसन सर्वात लांब आरामदायी आहे. मॅग्नस स्कूटरच्या डिकी मध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा असून ऍडव्हान्स डिजिटल स्पीडोमीटर आहे. अंधारात गैरसोय होऊ नये म्हणून या गाडीच्या डीकीमध्ये दिव्याचीही सोय आहे. मॅग्नससाठी चार्जिंगचा खर्च प्रति कि.मी. 11 पैशापेक्षा कमी येतो हे विशेष होय.Yash auto

मॅग्नस इएक्स स्कूटर खरेदीसाठी नामांकित बँका आणि फायनान्स संस्थांचे कमीत कमी डाऊन पेमेंट आणि व्याज दरातील कर्ज मिळवून देण्याची सुविधा यश ई -स्कूटर्स शोरूमच्या दालनात उपलब्ध आहे.खास दिवाळीसाठी आकर्षक कॅश बॅक ऑफर देण्यात येत आहे.याखेरीज कोणत्याही पेट्रोल दुचाकीच्या बदल्यात नवी मॅग्नस स्कूटर खरेदीची सोय देखील उपलब्ध आहे. या स्कूटरला रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स असून रहदारी नियमांचे पालन बंधनकारक आहे. या स्कूटरला भारत सरकारची सबसिडी असून सरकारच्या नियमानुसार सुरक्षा खबरदारी घेतलेली मॅग्नस इलेक्ट्रिक स्कूटर एआयआर मान्यता प्राप्त आहे. 50 ते 55 प्रति कि. मी. धावणाऱ्या या स्कूटरची लिथियम आयर्न बॅटरी असून तिला डिट्येचीबल सुविधा उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅग्नस इलेक्ट्रिक स्कूटर ही ध्वनी आणि वायू प्रदूषण विरहित दुचाकी आहे. एकंदर ही स्कूटर पर्यावरण पूरक असल्यामुळे प्रदूषण मुक्त बेळगावसाठी ही दुचाकी अतिशय अनुकूल सिद्ध होत आहे.

शिवसंत संजय मोरे संचलित शहरातील कॉलेज रोडवरील यश ई -स्कूटर्स शोरूम गेल्या 2.5 वर्षापासून बेळगावकरांच्या सेवेत आहे. शहरवासीयांची विश्वासार्हता कमविलेल्या या शोरूमच्या माध्यमातून असंख्य ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर्सचा आनंद घेत आहेत. या खेरीज कॉलेज रोडवर एकाच ठिकाणी असलेल्या यश ऑटोने गेल्या 25 वर्षापासून दुचाकी गाड्यांची दुरुस्ती वगैरे खात्रीपूर्ण सेवा देत लोकप्रियता कमाविली आहे हे देखील विशेष होय.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.