Friday, April 19, 2024

/

सामाजिक कार्यकर्त्याचे प्रशंसनीय रहदारी नियंत्रण

 belgaum

बेळगाव शहरात आज महनीय व्यक्तींच्या आगमनामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या निवारण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता प्रसाद चौगुले याची प्रशंसा होत आहे.

शनिवारी दुपारी नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमाला अनेक महानियांनी गर्दी केली होती कर्नाटक व गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांचे आज बेळगावात आगमन झाले होते. महणीय, अतिमहणीय व्यक्तींच्या आगमनामुळे शहरातील रहदारीच्या मार्गात बदल करण्यात आला होता.

मान्यवरांच्या सोयीसाठी मार्गात बदल करण्यात आला असला तरी त्याचा फटका मात्र शहरातील वाहनधारक सर्वसामान्य नागरिकांना बसला.Traffic cantrol

 belgaum

जिल्हा क्रीडांगणावर डॉ. कोरे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरू असताना शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोड, एपीएमसी रोड, सदाशिवनगर, नेहरूनगर वगैरे मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रसाद चौगुले याने स्वयंस्फूर्तीने वाहतूक सुरळीत करण्यास रहदारी पोलिसांना सहकार्य केले.

यासाठी प्रसादने रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहन चालकांना योग्य मार्गाने वळवत कोणालाही मनस्ताप न होता वाहतूक सुरळीत सुरू राहील याची दक्षता घेतली. प्रसाद चौगुले याने स्वयंस्फूर्तीने केलेल्या या कार्याचे कौतुक आणि प्रशंसा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.