Saturday, December 21, 2024

/

धोकादायक मांजाची समस्या ऐरणीवर

 belgaum

ऐन दिवाळीमध्ये जीवघेण्या धोकादायक पतंगाच्या मांजाने काल रविवारी वर्धन इराण्णा बेली या 6 वर्षाच्या चिमूरड्या बालकाचा बळी घेतला, तर दुसऱ्या एका घटनेत हलग्याहून बेळगावकडे येणारा मोटर सायकल स्वार मांजामुळे गळा कापल्याने जखमी झाला. सदर घटनांमुळे पतंगाच्या धोकादायक मांजाची समस्या ऐरणीवर आली असून प्रशासनाने मांजावर बंदी घालण्याबरोबरच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

दीपावली निमित्त कपडे खरेदीसाठी मोटारसायकलीवरून आपल्या वडिलांसोबत आलेल्या चिमुकल्यावर वर्धनचा कोवळा गळा मांजाने चिरला गेला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. बेळगाव शहरातील न्यू गांधीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर फ्रुट मार्केट जवळ काल रविवारी ही दुर्घटना घडली होती. त्या अगोदर सकाळी न्यू गांधीनगरच्या रेल्वे ब्रिजवर एक घटना घडली.

त्यामध्ये बेळगावकडे येणाऱ्या हलगा येथील ज्योतिबा हणमंताचे नावाच्या मोटरसायकल चालकाचा गळा मांजामुळे चिरला. मात्र सुदैवाने जखम खोलवर नसल्यामुळे त्याचा जीव वाचला. जीवघेण्या मांजाचा बळी जाण्याची बेळगाव मधील कालची दुसरी घटना आहे. पतंगाच्या मांजामुळे आतापर्यंत शहरात अनेक जण जखमी झाले असून बऱ्याच पशुपक्ष्यांचे बळी गेले आहेत.

Gandhi nagar highway
File pic: बेळगाव न्यु गांधी नगर फ्रुट मार्केट जवळील हायवेवरून दुचाकी स्वारक जातानाचे चित्र

मात्र मनुष्याचा बळी जाण्याची गेल्या 2 वर्षातील कालची दुसरी घटना आहे. दोन वर्षांपूर्वी काकती जवळ एका ईशान्यकडील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जीवघेण्या मांजामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर काल 6 वर्षाच्या चिमूरड्या बालकाचा मांज्याने बळी घेतला.Ramesh goral deewali

मुळात सप्टेंबर महिन्यानंतर पतंग उडवण्याची परंपरा असते. पतंग उडवण्याच्या शर्यतीमध्ये एखाद्याच्या पटींगला काटशह देण्यासाठी धारदार मांजा दोऱ्याचा वापर केला जातो. बेळगाव शहरांमध्ये सर्रास सर्व ठिकाणी या मांजाचा वापर केला जातो. तथापि या धोकादायक मांजामुळे घडणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मांज्यावर बंदी आणावी. पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करून पतंगाचे मांजे जप्त करावेत अशी मागणी कालच्या दुर्घटनेच्या निमित्ताने वाढू लागलेली आहे.

याव्यतिरिक्त कपिलेश्वर उड्डाणपूल असो गोगटे सर्कलचा रेल्वे उड्डाण पूल असो जुन्या पीबी रोडवरील उड्डाणपूल असो किंवा न्यू गांधीनगर ब्रिजवरील राष्ट्रीय महामार्ग असो या उंचावरील ठिकाणी मांजाने गळा कापला जाण्याचा धोका वाढला आहे. मागील काही वर्षात कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी कपलेश्वर उड्डान पुलावर 3 फुटाच्या अंतरावर दोन तारा बांधून हा ब्रिज सुरक्षित केला होता. तशा पद्धतीची उपायोजना जुना पी. बी. रोडवरील उड्डाणपूल येथे केली जावी.Chougule R m

तसेच राष्ट्रीय महामार्गावर न्यू गांधीनगर ब्रिजपासून ते बुड ऑफिसपर्यंत जवळपास दीड ते दोन कि. मी.चा जो परिसर आहे तेथे बेळगाव शहरातल्या बाजूनी खाली पडणाऱ्या मांजाचा अडथळा येणार नाही अशा पद्धतीने दोन तारा किंवा वायर बांधण्यात यावी.Lokmanya hospital

पाच फुटाच्या अंतरावर एक किंवा सहा फुटाच्या अंतरावर एक अशा तारा जर बांधल्या खाली येणारा मांजा वरून निघून जाईल आणि त्याचा दुचाकीस्वारांना कोणताही त्रास होणार नाही. जोपर्यंत प्रशासन मांज्यावर बंदी आणत नाही तोपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी वरील प्रमाणे उपाय योजना करून जनतेची काळजी घ्यावी अशी मागणी या निमित्ताने वाढू लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.