Friday, March 29, 2024

/

भरकटलेल्या मनोरुग्णाला केले बिम्समध्ये दाखल

 belgaum

व्यसनमुक्ती केंद्रने डिस्चार्ज दिल्याचे सांगून हात वर केल्यामुळे भरकटलेल्या अवस्थेत काल रात्रीपासून येळ्ळूर शिवाराच्या ठिकाणी रस्त्यावर बसून असलेल्या हुबळी परिसरातील एका मनोरुग्ण इसमाला सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेत्यांनी आज रविवारी सकाळी बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

याबाबतची माहिती अशी की, वडगाव येथील शेतकरी नेते राजू मरवे आज रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जात असताना त्यांना एक इसम पायाला सूज आल्याने असहाय्य अवस्थेत रस्त्यावर बसलेला आढळून आला. त्याची चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच मरवे यांनी आपल्या गाडीवरून त्याला भारतनगर बस स्टॉपवर आणले. तत्पूर्वी त्याला नाष्टा खाऊ घातला.

तसेच सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. दरेकर व मरवे यांनी त्या इसमाकडे असलेली पिशवी तपासली असता त्यामध्ये काही कपडे आणि शेट्टी गल्ली चिकोडी येथील आधार मद्यपान व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची कागदपत्रे आढळून आली. त्यावरून त्या इसमाचे नाव 50 वर्षीय प्रसन्नकुमार श्रीकांत भटकत असल्याचे समजले.Fb

 belgaum

तेंव्हा संतोष दरेकर यांनी आधार व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधला असता त्यांनी प्रथम आम्ही त्या रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे त्याच्याशी आमचा संबंध नाही असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र दरेकर यांनी धारेवर धरून पोलिसांची भीती दाखवताच व्यसनमुक्ती केंद्रकडून संबंधित इसमाच्या भावाचा आणि त्याच्या मित्राचा नंबर देण्यात आला. त्यापैकी भावाशी संपर्क होऊ शकला नाही तर त्याच्या मित्राने आपण बेंगलोर येथे ट्रेनिंगमध्ये असल्याचे सांगून बेळगावला येण्यास असमर्थता दाखविली.

तसेच तो इसम हुबळी येथील मुंदगोड गावचा असल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर संतोष दरेकर यांनी त्या इसमाला अनाथ म्हणून बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच सदर व्यक्तीला त्याच्या नातलगांनी किंवा त्याला ओळखणाऱ्यांनी स्वगृही घेऊन जावे, असे आवाहनही दरेकर व मरवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.