Wednesday, September 11, 2024

/

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात बेळगाव 171 व्या स्थानी

 belgaum

स्वच्छ सर्वेक्षण -2022 मध्ये राज्यात 7 वा क्रमांक पटकाविणाऱ्या बेळगाव शहराने संपूर्ण देशातील 382 शहरांमध्ये 171 वा क्रमांक मिळविला आहे. या खेरीज बेळगाव कॅन्टोन्मेंटने राज्यात प्रथम क्रमांक हस्तगत करण्याबरोबरच देशातील 62 कॅन्टोन्मेंटमध्ये 44 वा क्रमांक मिळविला आहे.

बेळगाव शहर हे 1 लाख ते 10 लाख लोकसंख्येच्या श्रेणीत मोडते. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये गेल्या 2021 साली 172 व्या स्थानावर असलेल्या बेळगाव यावेळी प्रगती करत एक स्थान पुढे सरकले आहे. याउलट बेळगाव कॅन्टोन्मेंटने चार स्थानाने प्रगती केली आहे. मागील वर्षी बेळगाव कॅन्टोन्मेंट देशात 48 व्या स्थानावर होते.

स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी 7500 गुण असतात यापैकी बेळगावला 3192.48 गुण मिळाले आहेत. भारत स्वच्छ भारत अभियानाचे आठवे वर्ष साजरे करत असून ताल कठोर स्टेडियम नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयातर्फे आयोजित दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुरूमू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सरोवर आणि महालांचे शहर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या इंदोर शहराने 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीमध्ये यंदा सलग सहाव्या वर्षी प्रथम क्रमांकासह देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकाविला आहे. इंदोर मागोमाग सुरत शहराने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर होण्याचा मान मिळवला, तर नवी मुंबईने तिसरा क्रमांक हस्तगत केला. लोकसंख्या 1 लाखापेक्षा कमी असलेल्या श्रेणीत महाराष्ट्रातील पाचगणी आणि कराड या शहरांनी स्वच्छतेच्या बाबतीत देशात अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांक मिळवला.Svachha

या गटात छत्तीसगडच्या पाटणा शहराने दुसरा क्रमांक मिळविला. सफाई मित्र सुरक्षा पुरस्कारामध्ये तिरुपती शहराने सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार प्राप्त केला, तर उत्तराखंड मधील हरिद्वार शहराला बेस्ट गंगा टाऊन पुरस्कार देण्यात आला. कर्नाटकातील शिमोगा शहराला स्वच्छतेत झपाट्याने प्रगती करणारे शहर हा पुरस्कार मिळाला.

कचरा निर्मूलनात इंदोर शहराला भारतातील पहिले ‘7 स्टार कचरा मुक्त शहर’ या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. त्या मागोमाग सुरत, भोपाळ, म्हैसूर, नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि तिरुपती यांना ‘5 स्टार कचरा मुक्त शहर’ प्रमाणपत्र मिळाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.