Friday, April 26, 2024

/

अर्भक प्लास्टिक पिशवीत झाडाला टांगले; एकाला अटक

 belgaum

नेरसा गवळीवाडा (ता. खानापूर) येथे नवजात अर्भक प्लास्टिक पिशवीत ठेवून ती झाडाला लटकाविल्याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एका संशयिताला अटक केली आहे.

मळू अप्पू पिंगळे (वय 21) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नांव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, नेरसा गवळीवाडा येथील एका अल्पवयीन मुलीशी मळूचे प्रेम संबंध होते.

त्यातून संबंधित मुलगी गर्भवती राहिली होती. तिची प्रसूती तिच्या घरीच झाली. मात्र पोलीस कारवाईच्या भीतीने तिने आपले दुष्कर्म लपविण्यासाठी तसेच लोकांच्या दृष्टीस पडावे या उद्देशाने गावाजवळील विटांमध्ये ते अर्भक प्लास्टिक पिशवीत घालून झाडाला टांगले.

 belgaum

सदर प्रकार आशा कार्यकर्त्या सत्यवती देसाई यांच्या निदर्शनास आला. प्लास्टिक पिशवीत अर्भक असल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायतीला कळवून त्या अर्भकाला खानापूर तालुका ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर ते अर्भक बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

याप्रकरणी संबंधित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि संशयित मळू पिंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी केली. त्याचप्रमाणे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून मुळूला अटक केली तर त्या मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.