belgaum

कॅंप पोलिसांच्या कारवाईत गांजा विक्री अड्ड्यावर छापा

0
127
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कॅंप परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला कॅंप पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून १ किलो १३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई फातिमा चर्च जवळील हायस्ट्रीट रोडवर करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८) फातिमा चर्च परिसरात एक तरुण स्वतःच्या फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कॅंप पोलीस ठाण्याच्या पीएसआय रुक्मिणी ए. आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी गंगाराम परशुराम सिंगनगुडी (वय २४, रा. गंगानगर, गणेशपूर, सुळगा) याला ताब्यात घेतले. या झडतीत ५६ हजार ५०० रुपये किमतीचा १ किलो १३० ग्रॅम गांजा मिळून आला, जो पोलिसांनी जप्त केला आहे.

 belgaum

आरोपी गंगाराम याची कसून चौकशी केली असता, त्याने हा गांजा सोलापूर (महाराष्ट्र) येथील सुनील नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली आहे.

यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध कॅंप पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कॅंप पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.