belgaum

कोल्हापुरात तपासासाठी गेलेल्या बेळगाव पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न

0
2492
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कोल्हापूरमध्ये तपासासाठी गेलेल्या बेळगाव पोलिसांवर दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली असून आरोपीने स्थानिकांना चिथावणी दिल्याने निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीतून महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने पथक सुखरूप बाहेर पडले.

सदलगा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात चिक्कोडी पोलिसांनी धीरज वाळवाळकर आणि रवी सोनार या दोघांना अटक केली होती.

तपासाचा भाग म्हणून चिक्कोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगला आणि त्यांचे पथक या आरोपींना घेऊन कोल्हापुरातील छत्रपती शिवाजीनगर येथे स्थळ पाहणीसाठी गेले होते. मात्र, घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी आपण निर्दोष असल्याचे ओरडून सांगत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

 belgaum

यावेळी आरोपींनी ‘हे पोलीस बनावट आहेत’ असे सांगून स्थानिकांची दिशाभूल केली. यामुळे आरोपींचे नातेवाईक आणि मित्रांनी एकत्र येऊन पोलिसांना घेराव घातला आणि त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून चिक्कोडी पोलिसांनी तातडीने स्थानिक महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला.

त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने कडक बंदोबस्तात आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन पोलीस पथक बेळगावला रवाना झाले. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.