belgaum

प्रादेशिक आयुक्त कार्यालयात विषप्राशन

0
411
 belgaum

बेळगाव लाईव्ह :जमीन भू-परिवर्तन (एनए) प्रकरणात होत असलेल्या विलंबामुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली.

हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय्या अम्मिनबाविमठ (वय 50) यांनी दोन एकर जमिनीचे एनए करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र अनेक दिवसांपासून ते विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत होते. हावेरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करूनही “लँड विथ चेंज” प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय एनए करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील प्रादेशिक आयुक्त कार्यालयात अनेक वेळा भेट देऊन पाठपुरावा केला होता. गुरुवारी ते प्रादेशिक आयुक्त जानकी यांची भेट घेण्यासाठी पुन्हा कार्यालयात आले. मात्र आयुक्त कार्यालयात अनुपस्थित असल्याचे समजताच ते निराश झाले आणि त्यांनी तेथेच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 belgaum

घटनेनंतर तात्काळ त्यांना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.