belgaum

कोप्पळ म. वाल्मिकी जयंतीत जारकिहोळी यांचा सहभाग

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी शुक्रवारी कोप्पळ येथे आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या आदर्शांचा, जीवनमूल्यांचा आणि समतेच्या संदेशाचा गौरव केला.

महर्षी वाल्मिकी यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या मूल्यांचा आपल्या जीवनात अंगीकार करून समता, सामाजिक सलोखा आणि सामाजिक न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन सतीश जारकिहोळी यांनी यावेळी केले.

राजनहळ्ळी येथील श्री महर्षी वाल्मिकी गुरुपीठाचे जगद्गुरू डॉ. प्रसन्नानंद पुरी स्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री टी. रघुमूर्ती, शिवराज तंगडगी, खासदार राजशेखर हिटनाळ, आमदार राघवेंद्र हिटनाळ, माजी खासदार संगण्णा करडी यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

कोप्पळमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकासकामांचा सतीश जारकिहोळींकडून आढावा

कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कोप्पळ जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रगती आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि अंमलबजावणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासह त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीला मंत्री शिवराज एस. तंगडगी, अनुसूचित जमाती कल्याण विभागाचे मंत्री टी. रघुमूर्ती, खासदार के. राजशेखर हिटनाळ, आमदार राघवेंद्र हिटनाळ, जिल्हाधिकारी सुरेश बी. इटनाळ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्णित नेगी, जिल्हा पोलीस अधीक्षक साहिल बागल, कोप्पळ नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रसन्न गडाद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.