Friday, April 19, 2024

/

नाल्यात क्रूझर पलटी सात कामगार ठार

 belgaum

गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावाहून कामगारांना बेळगावकडे घेऊन जाणारी क्रूझर गाडी बेळगाव जवळील कल्याळ बळळारी नाल्याला धडक देऊन पलटी होऊन पडल्याने सात जण जागीच ठार तर उर्वरित जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी,8च्या घडली आहे.

घटनास्थळी मारिहाळ पोलिस आणि धाव घेऊन जखमींना इस्पितळात पोचवले. सामरा रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या कामाला हे सर्व कामगार रविवारी सकाळी येत होते मात्र कामावर पोहोचण्याआधीच त्यांच्यावर काळाचा घाला आणि सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.बेळगाव चे पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोर्लिंगय्या आणि डी सी पी स्नेहा यांनी भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली.

गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळचे हे रहिवाशी असून बेळगाव जवळील कल्याळ पुलाजवळ हा अपघात घडला आहे.या अपघातात अडव्यापा चिलभावी (27)बसवराज दळवी (30)बसवराज हनमंणावर( 51)आकाश गस्ती (22)फकिरप्पा हरीजन( 55)
मल्लाप्पा दासनट्टी(30)बसवराज सनदी (35)  रा. सर्वजण गोकाक तालुका यांचा मृत्य झाला आहे.

 belgaum

क्रूझर चालक वाचला

गोकाक येथील अक्केतंगेरहाळ गावचा राहणारा भिमाप्पा कुंदर्गी वय 32 वर्षे हा क्रुझर चालक सुदैवाने या अपघातात बचावला आहे गाडी पलटी होत असताना त्याने वाहनातून उडी घेतल्याने तो जखमी झाला आहे एकूण 21 जण क्रूजर मधून प्रवास करत होते त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.

मयताच्या वारसांना 12 लाख मदत

या अपघातात मरण पावलेल्या सात जणांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 2 लाख आणि आमदार खात्याकडून पाच लाख असे एकूण बारा लाख मदत दिली जाणार आहे

 

 

बघ्यानी घटनास्थळी अपघात पहाण्यासाठी गर्दी केली त्यामुळे या रोडवर रहदारी जाम झाली होती मात्र पोलिसांनी अडथळा दूर करून गर्दी कमी केली. दरम्यान घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या,डी सी पी पी व्ही स्नेहा यांनी भेट देऊन पहाणी केली.Accident

असा झाला अपघात

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर चालकासह 18 कामगारांना घेऊन कडून बेळगावकडे येत होती त्यावेळी कल्याळ ब्रिज जवळ ओव्हरटेक करताना चालकाचे क्रुझर वरील नियंत्रण सुटले आणि क्रुझर तीन वेळा पलटी होऊन बळळारी नाल्यात कोसळली. क्रूझर इतक्या वेगात होती की तीन ते चारवेळा पलटी झाली या घटनेत सात जण जागीच ठार झालेत तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. Accident

सांबरा रेल्वे स्टेशनच्या कामाकरिता हे कामगार गोकाक कडून बेळगावला येत होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. रविवारच्या दिवशी कामावर दाखल होण्याआधीच त्यांच्यावर काळाचा घाला झाला आणि या कामगारांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.मयतांची ओळख अशी  पटली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.