belgaum

त्या..शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मागे; ग्रामस्थांच्या भूमिकेला यश

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सावगाव येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या निर्णयाविरोधात ग्रामस्थ, पालक, शाळा सुधारणा समिती तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत प्रशासनाकडे आपली भूमिका ठामपणे मांडली.

या पार्श्वभूमीवर वातावरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन बेळगाव क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) दान्नामा जाळकी यांनी गुरुवारी थेट सावगाव शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्याची विनंती केली.

मात्र, ग्रामस्थांनी मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड शाळा सुरू करण्यास ठाम विरोध दर्शविला. जुनी शाळा स्वच्छ करून वापरात आणावी किंवा दुरुस्ती होईपर्यंत भाडेतत्त्वावर जागा घेऊन शाळा चालवावी, त्यासाठीचे भाडेही आम्ही देण्यास तयार आहोत; मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत कन्नड शाळा सुरू करू नये, अशी मागणी त्यांनी केली.

 belgaum

ग्रामस्थांच्या भावना आणि मागणीची दखल घेत बीईओ दान्नामा जाळकी यांनी कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी पर्यायी जागा शोधून तेथेच शाळा भरविण्याचे मान्य केले. त्यामुळे सावगावातील मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर सागावकर, शिक्षण संयोजक बडीगेर, क्लस्टर प्रमुख सतीश पाटील, मुख्याध्यापक एल. एस. चांदीलकर, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.