बेळगाव लाईव्ह :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बेळगाव आणि राजश्री डेव्हलपर्स यांच्यावतीने बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मराठी मुला -मुलींच्या शाळेमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींना वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम आज शुक्रवारी उत्साहात पार पडला.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उ.बा.ठा.) बेळगाव आणि राजश्री डेव्हलपर्सतर्फे आज शुक्रवारी सकाळी कॅन्टोन्मेंट मराठी शाळेतील 605 मुलां-मुलींना एकूण 8500 वह्याचे वाटप करण्यात आले.
श्री सरस्वती पूजनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

त्याचप्रमाणे राजश्री डेव्हलपर्सच्या संस्थापिका राजश्री तुडयेकर यांनी उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थिनींसमोर मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना कधीही घरातून बाहेर पडताना आई-वडिलांच्या पाया पडावे, त्याचप्रमाणे शाळेत गेल्यानंतर शिक्षकांचे चरण स्पर्श करावेत असे सांगून जीवनातील आई-वडील आणि शिक्षकांचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, उपशहर प्रमुख राजू तूडयेकर, प्रशांत पवार, प्रवीण तेजम, संघटक तानाजी पावशे, एस. के. पोटे, प्रदीप सुतार, प्रकाश शिवाजी, विठ्ठल उंदरे, युवा सेनेचे विनायक हुलजी, वैभव कामत, शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा गावडे यांनी केले.




