Saturday, April 27, 2024

/

टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

 belgaum

टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. कोल्हापूर सर्कल युके-27 हॉटेल जवळ झालेल्या या घटनेत महिला शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

रेणुका भातकांडे वय 31 असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून सदर महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती.

रेणुका स्कुटी वरून जात असते वेळी टँकरला त्यांना धडक दिली त्या घटनेने त्या गंभीर जखमी झाल्या उपचारासाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यांचा या अपघातात मृत्यू झाला.

 belgaum

गेल्या काही महिन्यांपूर्वी रेणुका यांच्या पतीचे निधन झाले होते आता त्यांचेही निधन झाल्याने त्यांच्या पश्चात असलेली दोन लहान मुले पोरकी झाली आहेत अशीही माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.