belgaum

आज आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत बेळगाव दौऱ्यावर

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज सोमवारी(६ जुलै) बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत १० ते १२ जुलै दरम्यान अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक बेळगावमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील वरिष्ठ संघ पदाधिकारी सहभागी होणार असून, संघटनात्मक कामकाजाचा आढावा, शाखा विस्तार, प्रशिक्षण शिबिरे, शताब्दी वर्षानिमित्तचे उपक्रम आणि आगामी कार्ययोजनांवर चर्चा होणार आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ६ ते १४ जुलै या कालावधीत तीन प्रमुख ठिकाणांच्या दोन किलोमीटर परिसराला ‘रेड झोन’ (नो-फ्लाय झोन) घोषित केले आहे. या काळात ड्रोन, यूएव्ही (UAV), यूएएस (UAS) आणि पॅराग्लायडर उड्डाणास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

 belgaum

बेळगाव फाउंड्री क्लस्टर, संत मीरा स्कूल (भाग्यनगर एक्स्टेन्शन) आणि श्री जगन्नाथराव जोशी समदर्शन भवन (गुडशेड रोड) या परिसरांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, प्रमुख मार्गांवर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट नजर ठेवण्यात येत आहे.

डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्यामुळे पुढील काही दिवस बेळगावमध्ये संघाच्या विविध बैठका आणि कार्यक्रम पार पडणार असून, देशभरातील वरिष्ठ संघ पदाधिकाऱ्यांची शहरात उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.