Friday, April 26, 2024

/

सोमवारी समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन

 belgaum

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने 27 जून रोजी मराठी परिपत्रकांसाठी होणाऱ्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणारचं असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा निवेदन द्या अशी विनंती केली असता लोकशाहीच्या मार्गातून घटनेने दिलेल्या हक्कांसाठी आम्ही आंदोलन करणारचं अशी ठाम भूमिका समिती नेत्यांनी घेतली.यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दिपक दळवी,मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी उपस्थित होते.

बेळगाव सह सीमा भागांतील मराठी जनतेला भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळावेत यासाठी आगामी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.Mes memo

 belgaum

भाषिक अल्पसंख्याक कायद्या नुसार मराठीत शासकीय परिपत्रिक मिळावी यासाठी अनेकदा आंदोलने करून देखील कर्नाटकशासन याबाबत उदासीन आहे .

या विरोधात सोमवारी 27जून रोजी हा मोर्चा काढला जाणार आहे.सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे कॉलेज रोड मार्गे मोर्चा डी सी ऑफिसवर जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.