Monday, May 6, 2024

/

डॉ. सरनोबत यांनी केले नरेगा महिलांना मार्गदर्शन

 belgaum

खानापूर भाजप महिला मोर्चा प्रभारी आणि बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी नुकतीच खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशात असलेल्या गोधोळी गावाला भेट देऊन येथील नरेगा योजनेतील महिलांना मार्गदर्शन केले.

बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा आणि नियती फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या कार्याद्वारे ग्रामीण जनतेची मने जिंकली आहेत. खानापूर तालुक्यातील दुर्गम जंगल प्रदेशात असणार गोधोळी या मागास गावाला गेल्या गुरुवारी भेट दिली.

सदर गावात नरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या 200 ते 300 ग्रामीण स्त्री-पुरुष कामगारांची भेट घेणे हा डॉ. सरनोबत यांचा गोधोळी गावाला भेट देण्याचा मुख्य उद्देश होता. सदर भेटीप्रसंगी त्यांनी उपस्थित कामगारांची आपुलकीने चौकशी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी नरेगा योजनेचे फायदे सांगून या योजनेबद्दल जनजागृती केली. त्याचप्रमाणे मूलभूत नागरी समस्यांच्या बाबतीत आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही केले.Sonali sarnobat

 belgaum

आपल्या खानापूर दौर्‍यात डॉ. सोनाली सरनोबत यांनी गोधोळी व्यतिरिक्त जंगल प्रदेशातील अन्य कांही गावांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून त्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

दरम्यान, खानापूर तालुक्यातील जनतेने अधिक माहितीसाठी 9019095153, 9845870909 अथवा 9741784336 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.