Friday, March 29, 2024

/

‘बेळगावचा शिवसैनिक अस्वस्थ’…

 belgaum

महाराष्ट्रात सद्यस्थितीत चाललेल्या राजकीय साठमारी कडे बघताना बेळगावचा सामान्य शिवसैनिक मात्र जखमी झाला आहे. सामान्य शिवसैनिक हा कडवा असतो,आग्रही असतो आणि निष्ठावानही असतो. शिवसैनिकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,सेना भवन आणि मातोश्री हे आराध्य दैवत वाटत असते, त्यावर आलेले संकट हे आपल्या घरावर आलेलं संकट आहे असं या कट्टर शिवसैनिकांना वाटतं . शिवसेना नेहमी मराठी माणसाच्या हितासाठी झटत आलेली आहे, आणि झगडत आलेली आहे. प्रत्येक वेळी शिवसेनेने मराठी माणसासाठी लढली जाणारी रस्त्यावरची लढाई आग्रहीपणे, आक्रमकपणे लढली आहे.

बेळगावसह सीमावर्ती भागात असणारा शिवसैनिक हा सीमा लढ्यात नेहमी आघाडीवर राहिलेला आहे. सीमालढ्यात त्यानी हुतात्मेही दिले आहेत.एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड बेळगावातील शिवसैनिकांना विशेष पचनी पडलेलं दिसत नाही. आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना बेळगावच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या मुख्य प्रवाहातच कायम राहा असा आग्रह केलेला आहे.

बेळगावचे सामान्य शिवसैनिक बंडू केरवाडकर, प्रकाश राऊत,राजू तुडयेकर,सचिन गोरले आणि युवा सेनेचे चेतन गंगाधर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मूळ शिवसेनेशीच आम्ही निगडित आहोत असा विश्वास दाखवत शिवसेना फिनिक्स पक्ष्याप्रमाणे परत एकदा भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला.

 belgaum

शिवसेनेवर आलेलं संकट दूर करण्यास शिवसेनाआणि शिवसैनिक समर्थ आहेत,असाही आम्हाला विश्वास आहे अशा भावना त्यांनी मांडल्या. एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होईल आणि परत एकदा शिवसेना ताकदीने रस्त्यावर उतरेल असाही निर्वाळा त्यांनी दिला.Shivsena bgm

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई वाचवण्यासाठी गुजरात बरोबर महाराष्ट्राने केलेला संघर्षाच्या खुणा अजून ताज्याच आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीअनेक योजना मुंबईतून, महाराष्ट्रातून गुजरातला पळवल्या हे मराठी माणसाच्या पचनी पडलेले नाही.त्यातच एकनाथ शिंदे यांनी बंड करून आमदारांना सुरतला नेले.सुरतने एकेकाळी केलेला शिवाजी महाराजांना विरोध आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेली आक्रमणे ऐतिहासिक घटना आहेत.

त्याच ठिकाणी महाराष्ट्रातील आमदारांचा अपमान होणे, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे भवितव्य एकनाथ शिंदे यांनी सुरत मधून ठरवणे, हे देखील सामान्य शिवसैनिकांना पटलेलं नाही. रुचलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.