belgaum

राज्यस्तरीय उपकनिष्ठ हॉकी स्पर्धा संघ निवडीसाठी आवाहन

0
163
hockey bgm
hockey bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य हॉकी संघटना अर्थात हॉकी कर्नाटकतर्फे येत्या सोमवार दि. 18 ते शनिवार दि. 23 मे 2026 या कालावधीत बेंगलोर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या उपकनिष्ठ महिला (16 वर्षाखालील) राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी हॉकी बेळगाव संघाची निवड केली जाणार असून त्यासाठी नांव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

हॉकी कर्नाटकतर्फे शांतीनगर, बेंगलोर येथील फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा हॉकी मैदानावर येत्या दि. 18 मेपासून सहा दिवस कर्नाटक राज्यस्तरीय उपकनिष्ठ महिला (16 वर्षाखालील) हॉकी स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी 1 जानेवारी 2010 नंतर जन्मलेले हाॅकी खेळाडू पात्र असणार आहेत.

या स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा हॉकी संघटना अर्थात हॉकी बेळगावच्या संघाची लवकरच निवड केली आहे. तरी सदर निवड चांचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील हॉकी खेळणाऱ्या 16 वर्षाखालील मुलींनी येत्या शुक्रवार दि. 15 मे 2026 पर्यंत आपली नावे हॉकी बेळगावकडे नोंदवायची आहेत.

 belgaum

इच्छुकांनी अधिक माहिती व नांव नोंदणीसाठी हॉकी बेळगावचे मानद सचिव निवृत्त सुभेदार सुधाकर चाळके (मो.क्र. 9823425260) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.