Thursday, June 20, 2024

/

प्रकाश हुक्केरी, निराणी यांची आघाडी तर होरट्टी यांचा विजय

 belgaum

वायव्य शिक्षक मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी सुरुवातीच्या मतमोजणी मध्ये आघाडी मिळवली आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकवीस हजार पैकी जवळपास सहा हजार मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि अद्याप 14000 मतमोजणी व्हायची बाकी आहे यामध्ये प्रकाश हुक्केरी यांनी भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांच्यावर 1800 मतानी आघाडी मिळवली आहे.

वायव्य कर्नाटक पदवीधर मतदार संघामध्ये भाजपच्या हनुमंत निराणी यांनी मोठी आघाडी मिळवली असून ते मोठ्या फरकाने विजया कडे वाटचाल करत आहेत.  एकूणच वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांनी आणि भाजपच्या हनुमंत निराणी हे सुरुवातीच्या ट्रेंड वर आघाडीवर आहेत.Horatti

माजी शिक्षण मंत्र्यांचा विजय

 belgaum

पश्‍चिम शिक्षक मतदार संघात माजी शिक्षण मंत्री सध्या भाजपात आलेले भाजपाचे उमेदवार बसवराज होरट्टी यांनी 6449 मते मिळवत विजय संपादन केला आहे.

बसवराज होरट्टी यांच्याविरोधातील काँग्रेसच्या उमेदवाराला 3200 मते मिळाली आहेत या विजयाने होरट्टी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या ना एक प्रकारे चपराक दिली आहे.

“गेल्या 42 वर्षांपासून मी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून या क्षेत्रात काम करत आहे कोणताही काळा डाग नसताना मी काम करून दाखवलेल आहे या वेळीही माझा विजय निश्चितच होता विरोधकांनी केलेले आरोप जर सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास घेईन या विजयाने विरोधकांना नक्कीच चपराक बसली असेल” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी माध्यमांना दिली.

बंदोबस्तासाठी तैनात पोलीस हवालदार अत्यवस्थ

मतमोजणी केंद्रावर बंदोबस्तासाठी नियुक्त कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाचा एक हवालदार अत्यवस्थ झाल्याची घटना सकाळी बेळगावात घडली असून त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज बुधवारी शहरातील क्लब रोडवरील ज्योती कॉलेजमध्ये सुरू आहे. या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नियुक्त कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे (केएसआरपी) पोलीस हवालदार बी. जी. कापसे यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते अत्यवस्थ झाले. तेंव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबतची माहिती देऊन तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हवालदार कापसे यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.