Friday, March 29, 2024

/

बेळगाव वारकरी संघाचे ‘या’ पालखी सोहळ्यात 28 वे वर्ष

 belgaum

आषाढी निमित्त आळंदी येथे गुरुवर्य ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी महासंघाची वारी आजपासून मोठ्या उत्साहात भक्तिभावाने प्रारंभ झाली. बेळगाव सीमाभागातील जुन्या समजल्या जाणाऱ्या मानाच्या वारकरी संघ बेळगाव यांचे आषाढी वारीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे हे 28 वे वर्ष आहे.

आषाढी वारीसाठी महाराष्ट्रासह बेळगाव सीमाभाग कर्नाटक आणि देशाच्या विविध भागातून लाखो भाविक वारीत सहभागी होत असतात. सलग दोन वर्षांच्या काळात खंडित झालेल्या वारीनंतर या वर्षी पुन्हा एकदा आषाढी वारीचा जल्लोष सुरू झाला आहे. दोन वर्षांच्या खंडित परंपरेनंतर असंख्य माऊली भक्त मोठ्या आतुरतेने आषाढी वारीत सहभागी झाले आहेत.

बेळगाव सीमाभागात जुन्या समजल्या जाणाऱ्या मानाच्या वारकरी संघ बेळगाव यांचे वारीतील हे 28 वे वर्ष आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी संघ बेळगावचे तब्बल 700 हून अधिक वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत. आळंदी येथे गेल्या दोन दिवसांपासून वारकरी संघाच्या वारकऱ्यांनी मुक्काम केला आहे.

 belgaum

काल मंगळवारी सायंकाळी संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. गुरुवर्य ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी महासंघाची वारी आजपासून आळंदी येथे सुरू झाली आहे. पालखी सोहळा सुरू होण्यास आज सकाळी थोडा उशीर झाला त्यामुळे जेवणाची वेळ असल्याने लोकांमध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला, शिवाय याच वेळी पावसाचा वर्षाव झाला. परिणामी आनंदोत्सव आणि गैरसोय असे संमिश्र वातावरण निर्माण झाले होते.Dindi

वारीचे नेतृत्व करणारे गुरुवर्य भाऊसाहेब महाराज तब्बल 49 वर्षे आषाढी वारीला चालत जात असतात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याची वारीही ते अखंडितपणे करत आहेत. भाऊसाहेब महाराज हे नागपूर रामटेक कवी कालिदास संस्कृत विद्यापीठात किर्तन शास्त्र शिकवीत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव वारकरी महासंघाची वाटचाल सुरू आहे. अत्यंत नियोजनबद्धरीत्या वारकरी महासंघाचे वारी हे एक आगळेच वैशिष्ट आहे.

काल मंगळवारपासून सुरु होत असलेल्या पालखीची सांगता, पुढील महिन्यात 11 जुलैला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणार आहे. या दिंडीला वारकरी संघाचे अध्यक्ष गुरुवर्य भाऊसाहेब महाराज यांच्यासह हभप शंकर बाबली महाराज, हभप प्रभाकर सांबरेकर, हभप अशोक हरकारे, हभप एस. आर. पाटील यांच्यासह अनेकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.