आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर देशात 50 नवीन राज्य होणार असून बेळगावसह उत्तर कर्नाटक हे स्वतंत्र वेगळे राज्य होणार होईल असे वक्तव्य माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी केलंय.
बेळगाव बार असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे बेळगावात कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कायम संचारी खंडपीठ मंजूर झाले आहे. या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनला आज बुधवारी दिलेल्या भेटीप्रसंगी मंत्री कत्ती बोलत होते.
यापूर्वी उत्तर कर्नाटक हे वेगळ राज्य करा अशी मागणी करणाऱ्या उमेश कत्ती यांनी आज पुन्हा एकदा वरीलप्रमाणे जरा वेगळ्या पद्धतीने आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
भविष्यात देशात निर्माण होणाऱ्या स्वतंत्र राज्यांबद्दल बोलताना महाराष्ट्रात 3, कर्नाटकात 2 तर उत्तर प्रदेशामध्ये 4 नवीन राज्ये बनवणार असल्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे हुबळी -धारवाड, बेळगाव आदी ठिकाणच्या येथील कृषी, औद्योगिक, शिक्षण, व्यापार क्षेत्रातील प्रगती, हुबळी व बेळगाव येथील विमानतळं त्याचप्रमाणे आता कित्तुर येथे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी गोष्टींचा संदर्भ देऊन उत्तर कर्नाटक हे स्वतंत्र राज्य बनण्यास कसे लायक आहे असेही कत्ती म्हणाले.