Friday, April 19, 2024

/

विधान परिषदेसाठी भाजप वतीने लक्ष्मण सवदी उमेदवार

 belgaum

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे.

यादी अनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक,एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

याच बरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदारसंघातून बसवराज होरट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून भाजपने हनुमंत निराणी आणि अरुण शहापूर या दोघांना उमेदवारी दिली आहे त्यासाठी देखील विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

 belgaum

विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेत जाणाऱ्या सदस्यांसाठी भाजप कोट्यातून लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेत निवडून आलेले आमदार विधान परिषदेसाठी काही सदस्यांसाठी नियुक्ती करतात यात भाजपने सवदी यांना उमेदवारी देऊ केली आहे.

लक्ष्मण सवदी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अथणी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महेश कुमटहळळी यांचा तिकीट निश्चित मानले जात आहे.कुमटहळळी हे गोकाकचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे समर्थक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.