बेळगाव जवळील हिरेबागेवाडी बैलहोंगल रस्त्यावर वाहनाला अडवून अज्ञातांनी 4 कोटी 97 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे
8 एप्रिल रोजी गद्दीकरवीनकोप्प गावाजवळ ही घटना घडली आहे.सांगली येथील विकास विलास कदम नावाच्या इसमाने याविषयी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पाच अज्ञातांनी गाडी अडवून मोठी रक्कम लुटल्याची फिर्याद त्यांनी बैलहोंगल पोलिसात दाखल केली आहे.
विकास कदम हे कोल्हापूर येथे लक्ष्मी गोल्ड या नावाने सोन्याचे दुकान चालवतात कोल्हापूर हून उडुपीला पैसे पोचवते वेळी मध्ये हा दरोडा घालण्यात आल्याची माहिती कदम यानी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटली आहे.
एकूण चार कोटी 97 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम पोते आणि रटाच्या बॉक्समध्ये पॅक करून कार मध्ये ठेवले होते कार हिरे बागेवाडी ते बैलहोंगलच्या मध्ये असते वेळी कार अडवून हा दरोडा घालण्यात आला आहे.
या दरोड्यात सचिन भानुदास ऐहोळे आणि महादेव रामचंद्र बनसोडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. बैलहोंगल पोलिस स्थानकाचे निरीक्षक यू ए सातेनहळळी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.