Sunday, April 21, 2024

/

‘… महाराष्ट्र’ शब्दाला प्रशासनाची कावीळ

 belgaum

किणये येथील श्री राजा शिव छत्रपती युवक मंडळाच्या नुकत्याच बसवण्यात आलेल्या युवक मंडळाच्या फलकावरील महाराष्ट्र अश्या शब्दाचा उल्लेख असल्याने त्यातील अक्षरे वगळण्यात आली आहेत.

‘हृदयात महाराष्ट्र’या शब्दाला प्रशासनाची कावीळ झाली असून मंडळावर दबाव टाकून ‘हृदयात महाराष्ट्र’ हे शब्द हटवण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे.

गुरव गल्ली किणये  येथील युवक मंडळाने ‘नजरेत हिंदुराष्ट्र’ आणि ‘हृदयात महाराष्ट्र’ असा मजकूर फलकांवर लावला होता मात्र सोशल मीडियावर हा फलक सर्वत्र व्हायरल झाला होता ‘महाराष्ट्र’ शब्द हा प्रशासनाला खुपसत असल्याने मंडळावर दबाव टाकून ‘हृदयात महाराष्ट्र’ हे शब्द काढायला लावला आहे असा आरोप सथानिकांनी केला आहे या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.Kinye

महाराष्ट्रात देखील अनेक कर्नाटक संघ संस्था आहेत त्या फलकांवर कर्नाटक असा उल्लेख असलेले फलक आढळतात मात्र त्यावर कधीही महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला नाही मात्र स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्र उल्लेख असलेला शब्द दबाव टाकून काढायला लावला आहे.

दोन दिवसांपूर्वी हा फलक बसवण्यात आला होता त्यानंतर काल मंगळवारी हा फलक हटवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.