belgaum

राज्य पोलिस दलातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या 135 अधिकारी आणि पोलिसांना मुख्यमंत्री सुवर्णपदक जाहीर झाले आहे यामध्ये बेळगावच्या सहाहून अधिक अधिकारी व पोलिसांचा समावेश आहे.

राज्य गुप्तचर विभागाचे सीनियर इंटेलिजन्स असिस्टंट राजेंद्र उदय बडसगोळ यांना येत्या 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाणार आहे. राजेंद्र उदय बडसगोळ यापूर्वी खडेबाजार पोलिस ठाणे, बेळगाव डीसीआरई आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटरमध्ये सेवा बजावली आहे.Raju badasgol

सध्या ते राज्य गुप्तचर विभागात सीनियर इंटेलिजन्स असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री सुवर्णपदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे पोलिस दलासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पोलीस ध्वजदिन कार्यक्रम येत्या रविवार दि 2 एप्रिल रोजी होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण पदक यांचे वितरण केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.