Tuesday, September 17, 2024

/

‘या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री पदक’

 belgaum

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झालं आहे.

बेळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे या वर्षी एकूण 135 पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.बेळगाव जिल्ह्यातील पाच दक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सी एम मेडलची घोषणा झाल्याने पुन्हा एकदा जिल्ह्याचे नाव वर आले आहे.

जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री पदकासाठी घोषणा करणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी दिली आहे.Vijay shinnur

बेळगाव ए सी बी पोलीस निरीक्षक ए एस गोदीकोप्प, हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर,के एस आर पी दुसऱ्या घटकाचे आर पी आय यल्लप्पा बजंत्री, डी ए आर चे आर पी आय महादेवाप्पा कोटेवाले,संकेश्वर पोलीस स्थानकाचे पी एस आय गणपती कोंगनोळी यांची मुख्यमंत्री पदकासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावर्षी एकूण 135 पोलीस अधिकाऱ्यांना पदक देण्याची घोषणा करण्यात आली आहे.आगामी एप्रिल 2 रोजी बंगळुरू येथे सकाळी 8 वाजता कोरमंगल येथे के एस आर पी मैदानावर कार्यक्रमात पदक दिली जाणार आहेत.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.