Monday, July 15, 2024

/

असे मिळाले या घारीला जीवदान

 belgaum

जागरूक नागरिकाने दिलेल्या माहितीमुळे पशुपक्षी संरक्षक सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी एका पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या जखमी घारीला पकडून जीवदान दिल्याची घटना आज सकाळी टिळकवाडी येथील घडली.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आज रविवारी सकाळी 6 च्या सुमारास आगरकर रोड टिळकवाडी येथील संजय चौगुले यांचा फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना फोन आला. दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या संजय यांना गल्लीतील एका इमारतीच्या आवारात एक मोठी घार भरारी घेण्यासाठी जमिनीवर धडपडत असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी ही माहिती फोनवरून दरेकर यांना दिली. तेंव्हा दरेकर यांनी लागलीच आगरकर रोड येथे दाखल होऊ त्या घारीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भेदरलेल्या त्या घारीने प्रारंभी इकडे-तिकडे धावून उडण्याचा प्रयत्न केला.

अखेर संतोष दरेकर यांनी महत्प्रयासाने तिला पकडून तपासले असता पंखाला दुखापत होऊन जखमी झाल्यामुळे घारीला उडता येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तिच्यावर प्रथमोपचार केले.Eagle

त्यानंतर तिला वन खात्याच्या कार्यालयात जाऊन मोहम्मद किल्लेदार यांच्याकडे सुपूर्द केले. आता वन खात्याचे कर्मचारी त्या घारीवर अधिक उपचार करणार असून ती उडण्या योग्य झाली की तिला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे.

जखमी घारीला जीवदान मिळवून देण्यास सहकार्य केल्याबद्दल संतोष दरेकर यांनी वन खात्यासह संजय चौगुले यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच नागरिकांनी एखादा पशूपक्षी जखमी अथवा असहाय्यक अवस्थेत आढळल्यास आपल्याशी (9986809825) संपर्क साधावा, असे आवाहनही दरेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.