Tuesday, June 25, 2024

/

आता पुढील महिन्यात भारत -फ्रान्स लष्करी सराव

 belgaum

बेळगावमध्ये नुकताच ‘एक्स धर्मा गार्डियन -2022’ हा भारत-जपान संयुक्त लष्करी सराव झाल्यानंतर आता येत्या 10 एप्रिलपासून भारत आणि फ्रान्स देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे होणार आहे. त्यासाठी फ्रान्सहून पाच लष्करी अधिकाऱ्यांचे खास पथक भारतात डेहराडून येथे दाखल झाले असून पाहणीसाठी ते लवकरच बेळगावला येणार आहेत.

गेल्यावर्षी भारतातील गोरखा रायफल्सच्या जवानांनी फ्रान्समध्ये ‘एक्स शक्ती -2021’ अंतर्गत फ्रान्स -भारत संयुक्त लष्करी सराव केला होता. त्यामध्ये तीन लष्करी अधिकारी, तीन जूनियर कमांडर ऑफिसर व 37 जवानांनी भाग घेतला होता.

गेल्या 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 या काळात भारतीय लष्कराने फ्रान्समध्ये संयुक्त सराव केला होता. त्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळे संयुक्त सराव स्थगीत झाला होता.India france

 belgaum

आता जगावरील कोरोनाचे संकट टळले असल्यामुळे पुढील सराव बेळगावात होणार आहे. कोरोना संकट टळले तरी जगावरील दहशतवादाचे संकट कायम असल्यामुळे इतर राष्ट्रांशी अशा प्रकारचा संयुक्त सराव करून मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी भर देण्यात येत आहे. गतवर्षी राजस्थानमध्ये 8 ते 21 फेब्रुवारी दरम्यान भारत -अमेरिका आणि एप्रिल 2021 मध्ये भारत कझाकस्तान संयुक्त सराव कझाकस्तानमध्ये झाला होता.

जगात दहशतवाद फोफावत चालला असून अनेक राष्ट्रातील मैत्रीपूर्ण संबंध बिघडवण्याचे काम दहशतवादी संघटना करत आहेत. त्यांचा बीमोड करण्यासाठी इतर देशांशी संयुक्त सराव करणे गरजेचे आहे. त्यामुळे युद्धकलेची आणि सैन्यातील तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण-घेवाण होत असते. त्यामुळेच भारत -जपान नंतर आता भारत आणि फ्रान्स यांच्या लष्करी सरावाला महत्त्व आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.