Sunday, September 1, 2024

/

कुस्ती स्पर्धेत ‘हिने’ हस्तगत केले सुवर्ण

 belgaum

क्रीडा क्षेत्रात बेळगावचे नांव उज्वल करताना बस्तवाड (हलगा) गावची होतकरू मल्ल लक्ष्मी संजय पाटील हिने हरिहर (दावणगिरी) येथे झालेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक हस्तगत केले आहे.

दावणगिरी जिल्ह्यातील हरीहर येथील गांधी मैदानावर झालेल्या कुस्ती स्पर्धेतील महिलांच्या 55 किलो वजनी गटात लक्ष्मी पाटील हिने अंतिम लढतीत विजय संपादन करून सुवर्णपदकाचा मान मिळविला.

या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला मल्लांनी सहभाग घेतला होता. लहानपणापासून खेळांची आवड असलेल्या लक्ष्मी हिने यापूर्वी तालुका व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी नोंदविली आहे.

सध्या इयत्ता दहावीमध्ये शिकणारी लक्ष्मी हल्याळ येथील डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये कुस्तीचा सराव करते. तिला कुस्ती प्रशिक्षक तुकाराम घाडी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

लक्ष्मीचे वडील संजय पाटील हे शेतकरी असून त्यांची जेष्ठ कन्या शीतल ही देखील कुस्तीपटू आहे. तिने यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकाची कमाई केली आहे. उपरोक्त यशाबद्दल लक्ष्मी पाटील तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.