belgaum

तीन दिवसात सापडला ,ऐवज ही मिळाला आणि तो निघाला वैद्यकीय विद्यार्थी- एमबीबीएस करून डॉक्टर होण्याचे स्वप्न ,आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे मानसिक स्थितीही ठीक नाही. अशा परिस्थितीत त्याने बेळगावातील सर्वात महत्त्वाच्या गल्लीतील मंदिराच्या देवाच्या डोक्यावरील किरीट चोरले.

bg

अखेर चोरी झालेल्या तीन दिवसांच्या आतच तो मार्केट पोलिसांच्या तावडीत सापडला असून त्याने चोरलेले किरीट ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली असली तरी त्याच्या एकंदर परिस्थिती मुळे त्याच्यावर कारवाई बरोबरच उपचारांची गरज व्यक्त होत आहे.

पांगुळ गल्लीतील अश्‍वत्थामा मंदिरात चोरी करणारा चोर मार्केट पोलिसांच्या ताब्यात सापडला .अश्वत्थामा देवाच्या डोक्यावरील चांदीचे किरीट त्याने चोरले होते. तीन दिवसांच्या आतच मार्केट पोलिसांनी त्याला अटक केली. रविराज उमाकांत दंडवतीमठ असे या आरोपीचे नाव आहे. तो अंजनेय नगर येथील रहिवासी असून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .Pangul galli case

पोलिसांनी त्याची पार्श्वभूमी शोधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली असून हा चोरटा साधासुधा नाही तर वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी डोक्याला हात मारून घेतला आहे .

या चोरी मागची पार्श्वभूमी पोलिसांनी शोधले असता संबंधित रविराज एमबीबीएसच्या विद्यार्थी जरी असला तरी आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याचे मानसिक स्थैर्य बिघडले होते त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सहानभूतिच्या नजरेतून पाहून तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई बरोबरच त्याच्यावर समुपदेशन आणि इतर उपचार करावेत अशी मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.