Thursday, April 25, 2024

/

मुख्यमंत्र्यांनी बेळगावसाठी विशेष पॅकेज द्यावे :आमदार बेनके

 belgaum

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे बेळगावातील अनुभव मंडप मॉडेलच्या बांधकामासाठी विशेष पॅकेज देण्याची विनंती केली आहे.

बेळगाव येथील सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदार अनिल बेनके यांनी बेळगाव शहराच्या विकासावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.Bommai benke

मंडप उभारणीसाठी विशेष अनुदान देण्याची मागणी केली आहेबेळगावच्या राणी चन्नम्मा सर्कल येथे वीर राणीचा इतिहास, रायण्णा सर्कल आणि अशोका सर्कलच्या सुशोभीकरणासाठी विशेष अनुदान देण्याची विनंती करून या चौकांच्या विकासासाठी नियोजन करण्यासाठी नगरविकास विभागाला तातडीने सूचना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 belgaum

बेळगाव शहराच्या सुशोभिकरणाचा मुद्दा करत आमदार बेनके यांनी सरकार दरबारी अनेक मागण्या लाऊन धरल्या आहेत त्यात वरील चौकांच्या सुशोभीकरणाचा मुद्दा सामील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.