belgaum

सहकारी बँकांनी बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करावी : ओबेरॉय

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : “सहकारी बँकांनीही बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करण्यास कोणतीही हरकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना त्यांच्या गुंतवणुकीपैकी जास्तीत जास्त १० टक्के रक्कम बॉण्ड्समध्ये गुंतविण्याची परवानगी आहे,” अशी माहिती मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंटचे हरित ओबेरॉय यांनी दिली.

बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने गुरुवारी हॉटेल नेटिव्ह येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

बेळगाव जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांचे संचालक आणि कर्मचारी या परिसंवादाला उपस्थित होते. यावेळी ओबेरॉय यांनी बॉण्ड म्हणजे काय, ठेवींपेक्षा सध्या गुंतवणूकदारांचा बॉण्ड्सकडे वाढता कल का आहे आणि २०३० पर्यंत बॉण्ड्समधील गुंतवणूक कशा प्रकारे वाढण्याची शक्यता आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

 belgaum

याशिवाय सरकार कर्ज का घेते, सरकारी बॉण्ड्सची कार्यपद्धती कशी असते, तसेच सहकारी बँकांनी कॉर्पोरेट बॉण्ड्समध्येही नियमानुसार गुंतवणूक करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करताना भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.

परिसंवादादरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

कार्यक्रमात बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर, खजिनदार राजू ओऊळकर आणि संचालक एस. एस. पाटील यांनी हरित ओबेरॉय यांचे स्वागत केले. यावेळी मोतीलाल ओसवाल समूहाचे दक्षिण विभाग प्रमुख मनीष दोशी, चंद्रकांत पुरोहित, स्थानिक भागीदार आशुतोष कुंभोजकर, पुष्पराज जाधव तसेच विभागीय व्यवस्थापक आशिष पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आशुतोष कुंभोजकर आणि पुष्पराज जाधव यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.